मॉडेलिंग विश्वाच्या चर्चा सुरु झाल्यावर काही नावं आपेआपच समोर येतात. या नावांमध्ये मासिकं, सेलिब्रिटी फोटोग्राफर, डिझायनर, रनवे आर्टिस्ट या साऱ्यांचा समावेश असतो. याच यादीत येणारं एक नाव म्हणजे ‘किंगफिशर कॅलेंडर’. फॅशन जगतात किंगफिशर कॅलेंडरला बरंच महत्त्वं दिलं जातं. मॉडेलिंग विश्वात पदार्पण करणाऱ्या अनेकजणींसाठी किंगफिशरच्या कॅलेंडरवर झळकणं ही एक महत्त्वाची बाब असते. अशा या कॅलेंडरचं फोटोशूट आणि मॉडेल्सची निवड नेमकी कशी होते हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्येच कुतूहलही पाहायला मिळतं. याचाच अंदाज घेत विजय मल्ल्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये किंगफिशरच्या कॅलेंडर गर्ल्सचे फोटोशूट कसे होते, याची झलक पाहायला मिळतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेलिब्रिटी फोटोग्राफर अतुल कसबेकरने या कॅलेंडर गर्ल्सच्या अदा आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. फक्त मॉडेल आणि फोटोग्राफर यांना या फोटोशूटमध्ये महत्त्व दिले जाते असे नाही. तर फोटोशूटसाठी किंगफिशरतर्फे दरवर्षी काही सुरेख ठिकाणांची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी या फोटोशूटसाठी कोर्सिकाची निवड करण्यात आली होती.

मल्ल्याने शेअर केलल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून, मॉडेलिंग जगतात करिअर करणाऱ्या प्रियांका मूडले, मिताली रनुरे या कॅलेंडर गर्ल्सचा मादक अंदाज पाहायला मिळतो आहे.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kingfisher calendar girl 2018 photo shoot vijay mallya shared video
First published on: 17-01-2018 at 10:58 IST