हरहुन्नरी अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि अतरंगी गायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असलेल्या किशोर कुमार यांची आज जयंती. चित्रपटसृष्टीतील व्यक्तींकडून त्यांच्या आठवणी जागविल्या जात आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून किशोर कुमार यांच्याकडे पाहिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांडवामधील एका बंगाली घरात किशोर कुमार यांचा जन्म झाला. चार भावंडांमध्ये ते सर्वांत लहान होते. किशोर कुमार लहान असतानाच त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक बॉलिवूडमध्ये अभिनेते म्हणून प्रसिद्धीस येऊ लागले होते. अशोक यांच्या मदतीने नंतर अनूप यांनीसुद्धा चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे लहानपणापासूनच किशोर कुमार यांना चित्रपट आणि संगीतात आवड निर्माण झाली. गायक आणि अभिनेते के.एल.सैगल यांचे ते खूप मोठे फॅन होते. त्यांना ते गुरू मानत होते.

चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी पार्श्वगायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रसिद्ध गाणी गायली. हिंदी भाषेसोबतच त्यांनी मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम अशा विविध भाषांमध्येदेखील गाणी गायली आहेत. आभास कुमार गांगुली म्हणजेच किशोर कुमार यांनी अभिनयासोबतच ‘माना जनाब ने पुकारा नही’, ‘ओ हंसीनी मेरी हंसीनी’, ‘रुप तेरा मस्ताना’, ‘एक लडकी भिगी भागी सी’, ‘हाल कैसा है जनाब का’ अशी कितीतरी सुपरहिट गाणी गात रसिकांच्या मनावर राज्य केले.

वाचा : …म्हणून जान्हवी श्रीदेवीला वाईट आई म्हणाली

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्या श्रेणीमध्ये हा रेकॉर्ड अद्याप कोणीच ब्रेक करू शकले नाही. मध्य प्रदेश सरकारने ‘लता मंगेशकर पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान केला. अभिनय क्षेत्रात असूनही किशोर कुमार यांना लोकांमध्ये राहायला फारसे आवडत नसे. निसर्गाच्या सानिध्यात राहणे, झाडांशी बोलणे त्यांना फार आवडत असे. अशा हरहुन्नरी कलाकाराच्या जयंतीदिनी त्यांच्या गाजलेल्या १० गाण्यांची एक झलक पाहुयात…

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishore kumar birth anniversary 10 famous songs of kishore da
First published on: 04-08-2017 at 03:20 IST