आई मोगूबाई कुर्डीकर आणि बसलेल्या किशोरीताई. सोबत उभी असलेली त्यांची भावंडं.
१० एप्रिल हा किशोरीताईंचा जन्मदिन. नेहमीच्या कडक शिस्तीला रजा देणाऱ्या या दिवशी किशोरीताईंच्या सगळ्या शिष्यगणांचं एक अनौपचारिक स्नेहसंमेलनच व्हायचं. वेगवेगळ्या विषयांवर स्किट्स सादर केली जायची. अर्थातच ताईही त्यात समरसून सहभागी व्हायच्या.
रियाझ, मैफली या व्यस्ततेतून दोन निवांत क्षण पती रवींद्र आमोणकर यांच्या समवेत.
जगासाठी गानसरस्वती असलेल्या किशोरीताई घरच्यांसाठी प्रेमळ आई, आजी, सासू या सगळ्या भूमिकाही तेवढय़ाच समरसतेने जगल्या.
स्वरार्थरमणी ग्रंथाच्या कामात रमलेल्या गानसरस्वती. शिष्या नंदिनी बेडेकर या कामात मदत करत आहेत.
ती आई होती म्हणुनि..
दुधावरची साय तेजश्री आमोणकरसोबत
आम्ही मैत्रिणी जगावेगळ्या.. चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर, किशोरीताई आणि विजया मेहता एका प्रसन्न क्षणी.
स्वरब्रह्म आणि गुरुब्र्रह्म एका ठायी.. आई मोगूबाई कुर्डीकरांसोबत.
मुरलीधर भंडारी ओरिसाचे राज्यपाल असताना ओरिसा विद्यापीठाने किशोरीताईंना डी.लिट्. देऊन सन्मानित केलं. त्यासाठी ओरिसाला गेलेल्या किशोरीताई राजभवनात टेबलटेनिसचं टेबल पाहून चक्क दोन हात करायला उभ्या राहिल्या आणि टेबलाच्या या टोकापासून किस ही सव्र्हिस त्यांनी सफाईदारपणे केली. चेंडूचा पहिला टप्पा आपल्या बाजूच्या टेबलाच्या कोपऱ्यावर आणि दुसरा टप्पा थेट प्रतिस्पध्र्याच्या टेबलाच्या कोपऱ्यावर अशी ही सव्र्हिस करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्या उत्तम टेबलटेनिसपटू होत्या, हे फार थोडय़ा लोकांना माहीत होतं.
किशोरीताईंसाठी गुरुस्थानी असणाऱ्या अल्लादिया खाँ यांच्या स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी किशोरीताई न चुकता मुंबईत मरीन लाइन्स येथे त्यांच्या कबरीला भेट देत.
बहिणींचं सख्य
छायाचित्र सौजन्य : बिभास आमोणकर
response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा