समाजातील गोष्टींवर निर्भीडपणे आपलं मत मांडणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री कोंकणा सेन शर्माचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. ‘लिप्स्टीक अंडर माय बुरखा’सारख्या चित्रपटामध्ये तिने काम केलं आहे. आतापर्यंत तिने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्या आहेत. त्यामुळे कलाविश्वामध्ये तिची कायम चर्चा असते. मात्र सध्या तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिची चर्चा रंगली आहे. ‘माझ्या वाट्याला कधीच चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नाहीत’, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोंकणाने ‘ए मॉन्सून डेट’ या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबाबत बोलताना तिने तिची खंतही व्यक्त केली आहे. ‘डीएनए’च्या माहितीनुसार, “या पूर्वी मी अशी व्यक्तीरेखा कधीच साकारली नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने मला वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे. ही खरंच माझ्यासाठी फार मोठी बाब आहे. पहिल्यांदाच मला अशी महत्वाची आणि चांगल्या चित्रपटाची ऑफर आली आहे, यापूर्वी मला कधीच अशा चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स आल्या नव्हत्या”.

पुढे ती म्हणते, “मला चांगल्या ऑफर्स आल्या नाहीत. मात्र, या चित्रपटांच्या माध्यमातून मला कलाविश्वातील दिग्गज व्यक्तींसोबत काम करण्याची संधी देखील मिळाली. त्यामुळे मी स्वत:ला लकी असल्याचं मानते. मात्र ‘तलवार’ आणि ‘लिप्स्टीक अंडर माय बुरखा’सारखे चांगले चित्रपटही मला मिळाले”.

दरम्यान, ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिक्स्ड डबल्स’, ‘आजा नचले’ आणि ‘गौर हरि दास्तान’ या चित्रपटांमध्ये कोंकणा झळकली असून ती लवकरच ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटात झळकणार आहे.

 

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkona sen talk about her film a monsoon date and said i dont get good offer
First published on: 09-06-2019 at 12:36 IST