‘युट्यूब’ आणि ‘टिक-टॉक’ हे इंटरनेटवर सध्या सर्वाधिक वापरले जाणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. जगभरातील कोट्यवधी लोक या प्लॅटफॉर्म्सचा मनोरंजनासाठी वापर करतात. परंतु या दोघांमधील श्रेष्ठ कोण? असा एक नवा वाद सोशल मीडियावर सुरु झाला आहे. हा वाद इतका पेटला आहे की युट्यूब आणि टिक-टॉक या दोन्ही कम्युनिटीमधील लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या वादात आता वादग्रस्त व्यक्तिमत्व अभिनेता कमाल खानने देखील उडी घेतली आहे. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे त्याने स्वत:ला या दोघांपेक्षा श्रेष्ठ म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमकं काय म्हणाला कमाल खान?

कमाल खान उर्फ केआरकेला एका युजरने प्रश्न विचारला तू ‘युट्यूब’ आणि ‘टिक-टॉक’ या दोघांपैकी कोणाच्या बाजूने आहेस. यावर कमालने चकित करणारं उत्तर दिलं. “मी स्वत:च एक ब्रँड आहे. मी ‘टिक-टॉक’ किंवा ‘युट्यूब’ यांपैकी कोणाचाही बाजूने नाही. मी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माझी बरोबरी करण्यासाठी या ओटीटी प्लॅटफॉर्म्सला सात वेळा जन्म घ्यावा लागेल. मी कोणाचाही बाजूने नाही किंवा विरोधात नाही. मी तटस्थ आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कमालने उत्तर दिलं.

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तो नेहमीच चकित करणारी चित्रविचित्र वक्तव्य करत असतो. या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडिया वादावर केलेलं हे ट्विट सध्या जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या ट्विटसाठी कमालची खिल्ली देखील उडवली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk comment on youtube vs tiktok war mppg
First published on: 15-05-2020 at 13:18 IST