कुब्रा सैतने ट्विटर केलं अनइन्स्टॉल; पोस्ट शेअर करत दिली माहिती

कुब्रा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते, मात्र…

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री कुब्रा सैत हिने काही काळासाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेतला आहे. कुब्राने तिचं ट्विटर अनइन्स्टॉल केलं आहे. कुब्राने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियापासून काही काळासाठी ब्रेक घेत असल्याचं सांगितलं.

“मी काही काळ साऱ्यांपासून विभक्त होत आहे. सध्या मी एका कामात व्यस्त आहे.त्यामुळे तुम्हा सगळ्यांना काही काळासाठी अनइन्स्टॉल करत आहे”, अशा आशयाचं एक ट्विट कुब्राने केलं आहे.

कुब्राची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. यामध्येच प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर फराह खान अली हिनेदेखील कमेंट केली आहे. ‘योग्य निर्णय. पोस्टद्वारे तुझं व्यक्त होणं मिस करेन’, असं फराह खान अली म्हणाली आहे.

दरम्यान, कुब्रा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून ती अनेकदा कलाविश्वात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त झाली आहे. अलिकडेच अभिनेत्री कंगना रणौतला देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेविषयीदेखील कुब्राने टीकास्त्र डागलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kubbra sait is going on social media detox and uninstalled twitter ssj

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या