झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सृति झाची तब्येत काही दिवसांपासून बिघडली आहे. गेल्या काही काळापासून टीव्हीची प्रसिद्ध सून सृतिला क्षय रोग झाल्याचे म्हटले जात आहे. ती अजूनही यावर उपचार घेत आहे. ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सृतिला काही महिन्यांपूर्वी क्षय रोगाची लागण झाली होती. त्यातून ती बरीही झाली होती. पण आता हा क्षयरोग पुन्हा बळावला आहे. डॉक्टरांनी तिला जास्तीत जास्त आराम आणि पोषक आहार घेण्यास सांगितले आहे.
सृति झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. सक्तीचा आराम मिळाल्यानंतर ती जास्तीत जास्त पुस्तक वाचन करताना दिसते. काही दिवसांपूर्वी ‘कुमकुम भाग्य’ ही मालिका कुंडली भाग्यमध्ये बदलण्यात आली होती. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिके नेहमीच टॉप १० मध्ये असते. मालिकेत सृति झा मुन्नी आणि प्रज्ञा या दुहेरी भूमिका साकारत आहे. या मालिकेआधी सृतिला ‘जिया जले’ या ९एक्स वाहिनीवरील मालिकेत पाहिले गेले होते.