‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडीने घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज

आता या जोडप्याने संगनमताने वांद्रे कौंटुबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

जुही परमार, सचिन श्रॉफ

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात लग्नापेक्षा घटस्फोट किंवा ब्रेकअपच्याच बातम्या अधिक असल्याचे चित्र आहे. आता आणखी एक जोडी विभक्त होण्याच्या वाटेवर आहे. टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांनी दहा वर्षे एकत्र संसार केल्यानंतर ते घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. आता या जोडप्याने संगनमताने वांद्रे कौंटुबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

वाचा : जेव्हा सारा तेंडुलकरही एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरते

जुही आणि सचिनने एकमेकांशी चर्चा करून त्यांच्यातील इतर गोष्टींच्या वाटाघाटी केल्या आहेत. मात्र, त्यांची मुलगी समायरा कोणाकडे राहणार हे अद्याप कळलेलं नाही. पण जुहीला तिच्या मुलीचा ताबा मिळण्याची अधिक शक्यता आहे. सचिन – जुहीशी जवळीक असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सर्व ठीक होते. पण, जसजसा काळ लोटत गेला तसे त्यांच्यात छोटे-मोठे वाद होऊ लागले. त्यांच्यातील वाद आता सुटण्याच्या पलीकडे गेले आहेत. जुहीच्या ‘कर्मफल दाता शनी’ या पौराणिक मालिकेच्या लाँचवेळी सचिन अनुपस्थितीत होता.

वाचा : ‘टायगर जिंदा है’ मधील या ३५ चुका लक्षात आल्या का?

एका मालिकेदरम्यान या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर पाच महिन्यांच्या प्रेमप्रकरणानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २००९ साली जयपूर येथील पॅलेसमध्ये यांच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडला होता. टॉप ५० शाही लग्नांमध्ये जुही – सचिनच्या लग्न सोहळ्याचा समावेश आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kumkum star juhi parmar and sachin shroff file for divorce