छोट्या पडद्यावरील ‘कुंडली भाग्य’ ही मालिका सतत चर्चेत असते. ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये देखील टॉप ५मध्ये असल्याचे पाहायला मिळते. सध्या मालिकेत करण आणि प्रीती यांचा लग्नसोहळा दाखवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारे कलाकार श्रद्धा आर्या आणि धीरज धूपर मुख्य यांच्या मानधना विषयी चर्चा रंगल्या आहेत.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार श्रद्धा आणि धीरज मालिकेतील एका एपिसोडसाठी तडगं मानधन घेतात. मालिकेच्या संपूर्ण टीममध्ये या दोघांचे मानधन सर्वात जास्त आहे. धीरजचे सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग जास्त असल्यामुळे त्याचे मानधन जास्त असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
श्रद्धा प्रत्येक भागासाठी जवळपास साठ हजार रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे धीरज ६५ हजार रुपये घेत असल्याचे म्हटले जात आहे. मालिकेतील प्रीताची बहिण सृष्टी म्हणजेच अंजुम फकीह ही देखील तगडे मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.