७४ वा गोल्डन ग्लोब अवाॅर्ड सोहळा आज कॅलिफोर्नियात बेवर्ली हिल्समध्ये पार पडला. अपेक्षेप्रमाणे ‘ला ला लँड’ सिनेमाने यंदाच्या गोल्डन ग्लोबवर ७ अॅवाॅर्ड मिळवत वर्चस्व गाजवलं. ७ गोल्डन ग्लोब्ज मिळवत या सिनेमाने एक विक्रम बनवला आहे. याआधी एकाच सिनेमाला एवढे गोल्डन ग्लोब्स मिळाले नव्हते. टाकूयात एक नजर यावर्षीच्या विजेत्यांवर

 

१) बेस्ट सिनेमा  (म्युझिकल कॅटेगरी) :

‘ला ला लँड’

'ला ला लँड'
‘ला ला लँड’

या सिनेमाला जगभरातल्या सिनेमाचाहत्यांनी डोक्यावर घेतलंय. भारतातही मूव्ही पब्लिकला हा सिनेमा जाम आवडलाय. या सिनेमाने अवाॅर्ड जिंकताच आपल्याकडे ट्विटर आणि फेसबुकवर चाहत्यांनी जल्लोष केला. एक जॅझ संगीतकार आणि एक अभिनेत्री यांच्यातल्या प्रेमसंबंधांवर हा सिनेमा आहे. हा सिनेमा म्हणजे एक म्युझिकल आहे. सिनेमाचं संगीत आणि रायन गाॅसलिंग, एमा स्टोनची सहज अदाकारी सगळ्यांना फारच आवडलीये.

 

2) बेस्ट अॅक्टर  (म्युझिकल कॅटेगरी):

रायन गाॅसलिंग (ला ला लँड)

रायन गाॅसलिंग
रायन गाॅसलिंग

रायन गाॅसलिंग  ला ला लँडमध्ये जॅझ  पियानोवादकाच्या भूमिकेत फिट्ट बसलाय. अभिनयाची सौम्य शैली असलेला हा कॅनेडियन अॅक्टर महत्त्वाच्या सीन्समध्ये कमालीचा प्रभावी ठरतो. ‘द नोटबुक’ सिनेमामुळे जगभरातल्या तरूणींचा हार्टथ्राॅब ठरलेला रायन गाॅसलिंगला आतापर्यंत तुलनेने कमी प्रसिध्दी मिळाली आहे. गोल्डन ग्लोब अवाॅर्ड मिळवत त्याने आपली ताकद दाखवून दिलीये.

 

3) बेस्ट अॅक्ट्रेस (म्युझिकल कॅटेगरी):

एमा स्टोन ( ला ला लँड)

एमा स्टोन
एमा स्टोन

एमा स्टोन ही एक वेगळीच अॅक्ट्रेस आहे. हाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींमध्ये तिला गणलं जातं. पण तरीही टिपिकल ग्लॅम असी तिची इमेज नाहीये. द अमेझिंग स्पायडर मॅन-2 मध्ये सगळ्यांना आवडलेली आणि शेवटी डोळ्यांच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारी ग्वेन स्टेसी तिने फार सुंदर साकारली होती. ‘ला ला लँड’मध्येही तिने कमालीच्या ग्रेसफुली साकारलेली स्ट्रगलर अभिनेत्री सगळ्यांना वेड लावून गेली

४) बेस्ट डायरेक्टर:

डेमियन चझेल (ला ला लँड)

डेमियन चझेल
डेमियन चझेल

यंदाचं वर्ष याच सिनेमाचं आहे. डेमियन चझेल या ३१ वर्षांच्या डायरेक्टरने यावेळचा गोल्डन ग्लोब पटकावला. डेमियनला बेस्ट स्क्रीनरायटरचाही अवाॅर्ड मिळाला.

 

5) आऊटस्टँडिंग परफाॅर्मन्स इन सिनेमा :

मेरील स्ट्रीप

मेरील स्ट्रीप
मेरील स्ट्रीप

हाॅलिवूडमधलं हे जबरदस्त नाव सगळ्यांनाच माहितीये.गेली अनेक दशकं हाॅलिवूडमध्ये एकाहून एक परफाॅर्मन्स देत मेरील स्ट्रीपने आपलं अधिराज्य कायम ठेवलंय. ‘द डेव्हिल वेअर्स प्राडा’ सिनेमातून मेरील स्ट्रीपने अलीकडच्या वर्षांत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. गोल्डन ग्लोबचा लाईफटाईम अचिव्हमेंट समजला जाणार हा पुरस्कार मेरील स्ट्रीपला देत सिनेसृष्टीने त्यांचा गौरव केला.

 

६) बेस्ट सिनेमा ( ‘ड्रामा’ कॅटेगरी):

‘मूनलाईट’

moonlight-processed-new

‘ला ला लँड’ला याच सिनेमाची सर्वात जोरदार टक्कर होती. एका लाजाळू मुलाचा आयुष्यातसा प्रवास यात दाखवला आहे. हा सिनेमा ड्रामा कॅटेगरीतला बेस्ट सिनेमा ठरल्याने सिनेचाहत्यांमध्ये आनंद व्यक्त होतोय.

 

७) बेस्ट अॅक्टर (‘ड्रामा’ कॅटेगरी):

केसी अॅफ्लेक

cassey-affleck-processed-new

हाॅलिवूड सुपरस्टार बेन अॅफ्लेकचा केसी अॅफ्लेक हा भाऊ आहे. आतापर्यंत बेन अॅफ्लेकच्या सावलीत वावरणाऱ्या केसीने ‘मँचेस्टर बाय द सी’ या सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा अवाॅर्ड पटकावत आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे.

 

८) बेस्ट अॅक्ट्रेस (‘ड्रामा’ कॅटेगरी):

इझाबेल हुपेर (‘एल’)

इझाबेल हुपेर

इझाबेल हुपेर ही एक गुणी फ्रेंच अभिनेत्री आहे. तिला तिच्या फिल्मसाठी बेस्ट अॅक्ट्रेसचा अवाॅर्ड मिळाला.