छोट्या पडद्यावरील नवीन मालिका ‘लग्नाची वाईफ वेडिंगची बायको’ ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. मालिका सुरु होण्यापूर्वीच त्यातील कलाकारांची प्रेक्षकांमध्ये चर्चा होतांना दिसत आहे. यामध्ये विदेशी डॉल या व्यक्तीरेखेची विशेष चर्चा रंगत असून ही नवोदित अभिनेत्री नक्की कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
मालिकेमध्ये विदेशी डॉल ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव लियाना आनंद असं नाव आहे. नुकतीच तिने झी अवॉर्ड सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. लियानाची ही पहिलीच मालिका असून ती तिच्या भूमिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. लियाना ज्याप्रमाणे मालिकेमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस दाखविली आहे. त्याप्रमाणे ती प्रत्यक्षातही तितकीच स्टायलिश आहे.
दरम्यान, या मालिकेमध्ये विजय आंदळकर यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. विजयने यापूर्वीही अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे. तर ‘शैलेश कोरडे’ यांनी विजयच्या भावाची तर ‘ललिता अमृतकर’ हिने बहिणीची भूमिका साकारली आहे.