डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जातं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. ज्या शतकात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या एकोणिसाव्या शतकात आनंदी गोपाळ जोशी बोटीने अमेरिकेला गेल्या. तेव्हा त्या १८ वर्षांच्या होत्या. चार वर्ष परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतल्या. त्यांचा हा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८७५ ते १८८७चा काळ, ज्यावेळी रुढी आणि परंपरा यांचा प्रचंड पगडा होता. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणून आनंदी गोपाळ आजही ओळखल्या जातात. तेव्हाचा तो काळ अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. तो काळ आणि आनंदी-गोपाळ या दाम्पत्याचा परिस्थितीबरोबरचा संघर्ष अनुभवायचा असेल तर ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट नक्की बघावा.
आनंदीबाईंच्या भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद आणि गोपाळराव यांच्या भूमिकेतील ललित प्रभाकर यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या. पटकथाकार-संवादलेखन आणि दिग्दर्शनही प्रभावी आहे. यामध्ये छोटी यमू म्हणजेच आनंदीबाईंच्या बालपणीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अंकिता गोस्वामी हिनेही सुरेख अभिनय केला आहे. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक-सांस्कृतिक चित्र अत्यंत नेमकं उतरलं आहे. कलाकारांचं दमदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरते. विक्षिप्त स्वभावाच्या गोपाळरावांची भूमिका ललितने अप्रतिम साकारली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit prabhakar bhagyashree milind starrer anandi gopal movie review
First published on: 15-02-2019 at 13:30 IST