सुप्रसिध्द पार्श्वगायक मन्ना डे (९४) यांचे प्रदीर्घ आजाराने बेंगळुरू येथील रूग्णालयामध्ये गुरुवारी निधन झाले.  मन्ना डे यांच्या निधनावर बॉलिवूडने दु:ख व्यक्त केले आहे. अनेक स्टारमंडळींनी टि्वटरवर मन्ना यांच्या आठवणी सांगत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
सुप्रसिध्द पार्श्वगायीका लता मंगेशकर यांनी मन्ना यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे.
“आज महान शास्त्रीय व पार्श्वगायक मन्ना डे साहेब आपल्यातून निघून गेले. आम्ही सर्वजण त्यांना मन्ना दा म्हणायचो. माझ्या आठवणीप्रमाणे मन्ना दा यांच्या सोबत मी १९४७/४८मध्ये अनिल बिश्वास यांचे शास्त्रीय गीत गायले होते. ते माझे मन्ना दा यांच्या सोबतचे पहिले गाणे होते. मन्ना दा सतत हसमुख आणि सरळ स्वभावाचे गृहस्त होते. त्यांच्या कामाप्रती मन्ना दा खूप समर्पीत होते. मी त्यांना प्रणाम करते,” असे लता मंगेशकर म्हणाल्या.
“मन्ना डे, संगित जगतातील एक निष्ठावान हरपला. त्यांच्या आठवणी दाटून आल्या आहेत. ठरावीक म्हटले तर, मधूशाला चित्रपटातील त्यांनी गायलेल्या गाण्यांची आज आठवण होत आहे,” या आशयाचा टि्वट बीग-बी अमिताभ बच्चन यांनी केला आहे.

 

 

“मन्ना डे यांचा आवाज एकमेवाद्वितीय होता. त्यांची गाणी ये मेरी झोहरा जबी/ दिलका हाल सुनये दिलवाले/ पुछोना कैसे मैने या गाण्यांमधून ते आपल्यासोबत सदैव असतील,” या आशयाचा टि्वट बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी केला आहे.