scorecardresearch

”मेरी आवाज ही…” लता मंगेशकरांच्या स्मरणार्थ सुदर्शन पटनाईक यांची वाळूशिल्पातून अनोखी आदरांजली

आज लतादीदींच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

lata mangeshkar sand art
लता मंगेशकर वाळूशिल्प (सोशल मीडिया)

Lata Mangeshkar Death Anniversary: भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतिदिन आहे. आपल्या मधूर आवाजाने त्यांनी भारतीयांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वामध्ये कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली. अनेक अजरामर गाण्यांच्या माध्यमामधून लतादीदी अमर आहेत. आज त्यांच्या स्मरणार्थ देशभरामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वयाच्या तेराव्या वर्षी लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रामधील त्यांच्या प्रगल्भ कारकीर्दीची सुरुवात केली. मराठी, हिंदीसह बऱ्याच भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत. तब्बल पाच दशक त्यांनी पार्श्वगायन केले. जगभरामध्ये त्यांचे चाहते आहेत. २००१ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याआधी त्यांना पद्म भूषण, पद्म विभूषण यांसारखे असंख्य पुरस्कार प्राप्त झाले होते. लतादीदींच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे चाहते वेगेवेगळ्या पद्धतीने त्यांना आदरांजली वाहत आहेत. सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनीही भारताच्या गानकोकिळेला श्रद्धांजली वाहिली आहे.

आणखी वाचा – Lata Mangeshkar Death Anniversary : “दीदी गेल्या असल्या तरी…” लता मंगेशकरांच्या आठवणीत राज ठाकरे भावूक

त्यांनी लता मंगेशकर यांचे ६ फूटाचे वाळूशिल्प तयार केले आहे. या शिल्पाभोवती ”मेरी आवाज ही पेहचान हेै” या गीताच्या काही ओळी लिहिलेल्या आहेत. सुदर्शन पटनायक यांनी या शिल्पाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ”भारतरत्न, भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांचे त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीदिनी स्मरण. पुरी समुद्रकिनाऱ्यावर तयार केलेले हे वाळूशिल्प मी त्यांना समर्पित करतो”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. या भव्यदिव्य वाळूशिल्पाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ‘ते’ तीन वेदनादायक महिने, मृत्यूच्या दाढेतून परतल्या होत्या सुखरुप

वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून लतादीदींनी गायनाचे धडे गिरवले. गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 12:53 IST

संबंधित बातम्या