सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपरस्टार सिंगर’ या रिअॅलिटी शो ने या पहिल्या सिझनमध्येच छोट्या गायकांच्या गानप्रतिभेच्या खजिन्याद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. आगामी भागात ते दिग्गज संगीतकार श्री प्यारेलाल प्रसाद शर्मा यांच्या संगीत युगातील गाणी सादर करताना दिसतील. जादुई जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेल्या काही अविस्मरणीय सदाबहार गाण्यांवर स्पर्धकांनी सुरेल सादरीकरण केले.
सुलतानपूरच्या 13 वर्षांच्या निष्ठा शर्माने ‘सोला बरस की बाली उमर को सलाम’ हे ‘बॉलिवूडच्या नाईटिंगेल’ म्हणून ओळखल्या जाणार्या आदरणीय आणि लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांनी गायलेले अमर गाणे सादर केले. निष्ठाच्या अद्भुत कामगिरीनंतर तिच्या सुरेल आवाजाने श्रोत्यांच्या काळजाला हात घातलाच पण ते भावूकही झाले. दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्यासमवेत अशी मधुर गाणी जेव्हा रेकॉर्ड केली होती त्या काळच्या स्मृतींमध्ये प्यारेलाल हरवून गेले.
यावेळी परीक्षक जावेद अलीने एक किस्सा सांगितला. “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात 2010 मध्ये ए आर रेहमान यांनी सुंदर संगीत दिलेल्या ‘एंथिरन’ चित्रपटातील किलीमांजारो या गाण्यानंतर लतादीदींनी मला फोन केला आणि माझ्या गाण्याचे कौतुक केले. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी मला एक कुराण आणि माझ्या परिवारासाठी भेटवस्तूसुद्धा पाठवल्या. ही गोष्ट मला कायम लक्षात राहील. तो दिवस आणि आजचा दिवस… तो क्षण माझ्या आठवणीत ताजा आहे आणि त्यांनी माझ्यावर आणि माझ्या परिवारावर त्यांनी केलेले प्रेम आणि दिलेले आशीर्वाद माझ्या कायम स्मरणात राहतील. लतादीदींनी कौतुकाची थाप दिल्यावर आपण आपल्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे हे तुम्हाला कळते. मला आत्तापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी त्या एक अतिशय दयाळू आणि नम्र व्यक्ती आहे,” असं जावेदने सांगितलं.