रवी जाधव दिग्दर्शित ‘रंपाट’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे व त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकले. त्यानिमित्ताने मायलेकाच्या या जोडीने ‘झिंग झिंग झिंगाट’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
अभिनयचे अभिनय गुण तर आपण त्याच्या चित्रपटांमधून पाहिले. पण अभिनयाव्यतिरिक्त त्याच्यात आणखी एक कला आहे ती म्हणजे गायनाची. या कार्यक्रमात अभिनयने ‘खेळ मांडला’ हे गाणं गायलं आणि उपस्थितांची मनं जिंकली.
"अभिनय" गुण आपण पाहिलेत आता हे Talent सुद्धा पहा. #ZingZingZIngat #ZeeMarathi @berde93 @aadeshbandekar @TheZeeStudios @meranamravi pic.twitter.com/TycMb7r6NE
— Zee Marathi (@zeemarathi) May 15, 2019
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘हृदयी वसंत फुलताना..’ या गाण्यावर अभिनय आणि प्रिया बेर्डे यांनी ठेकासुद्धा धरला. मूळ गाण्यात लक्ष्मीकांत यांच्यासोबत प्रिया बेर्डे झळकल्या होत्या.
प्रिया बेर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘अभिनयसोबत काम करताना मला लक्ष्मीकांतचा भास व्हायचा. त्याचे डोळे, केस व हावभाव पाहून काही क्षणाला मला लक्ष्मीकांतची जाणीव व्हायची.’