आईच म्हणाली २२ वर्षांच्या तरुणीला डेट कर, अभिनेत्याचं स्पष्टीकरण

तो आपल्या आईच्या आज्ञेचे पालन करतोय.

‘टायटॅनिक’ फेम लिओनार्डो डिकॅप्रिओ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. मात्र ऑस्कर पुरस्कार पटकवणारा हा अभिनेता अफलातून अभिनयाबरोबरच आपल्या प्रेमप्रकरणांमुळेही चर्चेत असतो. आजवर त्याचे नाव ख्रिस्टन झँग, केट विंसलेट, अँबर वेलेटा, ब्रिटीनी डॅनिअल यांसारख्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. सध्या तो एका २२ वर्षीय तरुणीमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तो आपल्या आईच्या आज्ञेमुळे तिला डेट करतोय.

Throwback 2019 : ‘रे मिस्टेरिओ’सहीत या १५ खेळाडूंनी केला WWE ला अलविदा

नेटफ्लिक्सला मोठा फटका.. महिन्याभरात दशलक्ष सबस्क्राइबर्स गमावले कारण..

 

View this post on Instagram

 

tonight

A post shared by Camila Morrone (@camilamorrone) on

सेलिब्रिटी शेफचा गूढ मृत्यू; स्वयंपाकघरात आढळला मृतदेह

४५ वर्षीय लिओनार्डोच्या आयुष्यात आलेल्या या नव्या तरुणीचे नाव कॅमेला मोरोन असे आहे. कॅमेला ही मॉडलिंग क्षेत्रातील सध्याची आघाडिची तरुणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून लिओनार्डो तिला डेट करत आहे.

रडार ऑनलाईने दिलेल्या वृत्तानुसार लिओनार्डो आपल्या आईसाठी तिला डेट करत आहे. त्याच्या आईला तिचा स्वभाव खुप आवडला. ती लिओनार्डोची खुप काळजी घेते. तसेच तो आता ४४ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याने लवकरात लवकर लग्न करावे अशी आईची इच्छा आहे. त्यामुळे आईनेच त्याला कॅमेलाबरोबर जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्यास सांगितले आहे. परिणामी केवळ आईसाठी आता लिओनार्डो निम्म्या वयाच्या तरुणीला डेट करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leonardo dicaprios mother wants him to propose to girlfriend camila morrone mppg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या