संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत रिडिफाइन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या आगामी चरित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग म्हणून एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर या दिग्गज कलावंतांची पुढची पिढी, आकाशवाणी पुणे केंद्राच्या काही सन्माननीय व्यक्ती, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सौरभ गाडगीळ, लेखक – दिग्दर्शक – निर्माते योगेश देशपांडे, कलाकार सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, धीरेश जोशी, परितोष प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी या मान्यवरांबरोबर गप्पांची मैफलही रंगली. या कार्यक्रमादरम्यान ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २० फूट उंच अशा भव्य पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या पोस्टरवर चित्रपटातील सगळय़ा नामांकित व्यक्तिरेखा झळकल्या आहेत. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे या वेळी चित्रपटात सादर करण्यात आलेली ‘गीतरामायण’मधील प्रसिद्ध गाणी आणि ‘गीतरामायणा’च्या प्रवासातील अविस्मरणीय क्षणही दाखवण्यात आले. 

Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Mrunmayee Deshpande talks about her character in Swargandharva Sudhir Phadke Movie
इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

हेही वाचा >>>Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…

या कार्यक्रमात सुधीर फडके म्हणजेच बाबूजींचे व्यक्तिमत्त्व, त्यांची गाण्याची आवड, गाणी तयार होताना घडलेले प्रसंग, शब्दांचे गीत होतानाच प्रवासही या वेळी उलगडण्यात आला. १ एप्रिल १९५५ रोजी सुरू झालेल्या ‘गीतरामायण’ शृंखलेचे ७० व्या वर्षांत पदार्पण होत असताना, या अजरामर कलाकृतीचा भावपूर्ण, गंधयुक्त आणि सुमधुर आठवणींचा खजिना उलगडण्याचा एक प्रयत्न या वेळी करण्यात आला.