मालवणी भाषेला नाटकांच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर आणून या भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आणि ही नाटके तुफान लोकप्रिय करण्यात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मच्छिंद्र कांबळी यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्या भद्रकाली नाटय़संस्थेमार्फत कांबळी यांनी ही नाटके सादर केली. काबंळी यांनी रंगभूमीला दिलेल्या या योगदानाची दखल घेऊन शिवाजी मंदिरात त्यांचे छायचित्र लावण्यात आले आहे. नाटय़गृहात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, शिवाजी मंदिरचे विश्वस्त शशी भालेकर, चंद्रकांत सावंत यांच्यासह प्रशांत दामले, अशोक हांडे, महेश मांजरेकर, भरत जाधव, चंद्रकांत कुलकर्णी,मनोज जोशी, पुष्कर श्रोत्री, आदिती सारंगधर, सिद्धार्थ जाधव, चिन्मय मांडलेकर, प्रतीक्षा लोणकर, प्रशांत दळवी, प्रसाद ओक, संतोष जुवेकर, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, तेजस्वीनी पंडित, नेहा जोशी, मधुरा वेलणकर, रवी जाधव, ओम राऊत, अभिजीत पानसे, स्वप्नील जोशी, विजय पाध्ये, गंगाराम गवाणकर आदी रंगकर्मी उपस्थित होते.
अरुण काकडे यांनी कांबळी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तर भद्रकाली नाटय़संस्थेचे निर्माते आणि मच्छिंद्र कांबळी यांचे सुपुत्र प्रसाद कांबळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jul 2014 रोजी प्रकाशित
शिवाजी मंदिरात मच्छिंद्र कांबळी यांचे छायाचित्र
मालवणी भाषेला नाटकांच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर आणून या भाषेला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आणि ही नाटके तुफान लोकप्रिय करण्यात ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मच्छिंद्र कांबळी यांचा मोलाचा वाटा आहे.

First published on: 23-07-2014 at 06:30 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Machindra kambli portrait in shivaji mandir