scorecardresearch

Premium

‘द रिलक्टंट फंडामेंटालिस्ट’ हा युवा पिढीचा चित्रपट : मीरा नायर

दिग्दर्शक मीरा नायरने ‘द रिलक्टंट फंडामेंटालिस्ट’ या तिच्या आगामी चित्रपटात भारतीय समाज आणि हॉलिवूड या दोन्ही विश्वांचा समावेश केला आहे. तिने या चित्रपटात नातेसंबंधातील ओळख आणि आपलेपणा या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘द रिलक्टंट फंडामेंटालिस्ट’ हा युवा पिढीचा चित्रपट : मीरा नायर

दिग्दर्शक मीरा नायरने  ‘द रिलक्टंट फंडामेंटालिस्ट’  या तिच्या आगामी चित्रपटात भारतीय समाज आणि हॉलिवूड या दोन्ही विश्वांचा समावेश केला आहे. तिने या चित्रपटात नातेसंबंधातील ओळख आणि आपलेपणा या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा चित्रपट पाकिस्तानी लेखक मोहसिन हामिद यांच्या कादंबरीवर अधारित आहे. ११ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील ट्विन टॉवरवर झालेल्या हल्ल्यानंतर एका पाकिस्तानी युवकाच्या मनात अमेरिकेविषयी निर्माण झालेले प्रेम आणि त्यानंतर त्याच्याबरोबर झालेल्या काही अप्रिय घटनांमुळे त्याचा झालेला भ्रमनिरास या चित्रपटात दखविण्यात आला आहे. मीराने सांगितले की, या चित्रपटातील तरूण अनेक गोष्टींचा पहिल्यांदाच अनुभव घेतो. माझा मुलगा आणि वीस वर्षे वयाच्या मुलांसाठी हा चित्रपट बनवणे गरजेचे होते. चित्रपटाची कहाणी दाखविते की आपण आपल्या उपजिवीकेसाठीचा मार्ग कशाप्रकारे निवडतो. परंतु, आज हा मार्ग २० वर्षापूर्वीच्या तुलनेत अधीक जटील बनला आहे.
मीरा पुढे म्हणाली की, चित्रपटात दाखविण्यात आले आहे की अमेरिकेची स्वप्ने पहाणारे जेव्हा तेथे पोहोचतात तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. परंतु, आपण खरोखरच आपल्या या स्थितीला समजून घेतो का? असा प्रश्न हा चित्रपट उपस्थित करतो.
या चित्रपटात मुख्य भूमिकेत रियाझ अहमद नावाचा कलाकार असून, हॉलीवूड आणि बॉलिवूडमधील केट हडसन, कीफर सदरलॅंड, लाइव श्राइबर, ओम पुरी आणि शबाना आजमी अशा दिग्गजांनी त्याला साथ दिली आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट भारतात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी तो पाकिस्तानात सुद्धा प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटातील बराचसचा भाग लाहोरमध्ये घडतो, यासाठी दिल्लीमध्ये लाहोरचा सेट उभारला  गेला होता. वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शुभारंभ झालेल्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.  मीरा नायरने या आधी ‘सलाम बॉम्बे’, ‘मिसीसिप्पी मसाला’, ‘मान्सून वेडिंग’ आणि ‘अमेलिया’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

rajveer deol
‘प्रादेशिक चित्रपट बोलके असतात’
junior ntr saif ali khan and janhvi kapoor starrer telugu film devara
दाक्षिणात्य सुपरस्टारसह जान्हवी कपूर करणार रोमान्स, तर सैफ अली खान साकारणार ‘ही’ भूमिका, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
shahid-kapoor-haider
‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने घेतलं नव्हतं मानधन; मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने सांगितलं कारण
rajamouli-made-in-india
‘भारतीय चित्रपटा’चा बायोपिक; एसएस राजामौलींच्या आगामी बिग बजेट चित्रपटाची घोषणा

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Made the reluctant fundamentalist for young generation mira nair

First published on: 14-05-2013 at 06:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×