लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा आज पार पडत आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात मतदान होत असताना अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूडचे अभिनेते परेश रावल यांनीही मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. लोकशाहीमध्ये मतदान हा आपला मौलिक अधिकार आहे, असे सांगताना रावल म्हणाले, “सरकारने हे केले नाही, ते केले नाही, असा नेहमीच आरोप लोकांकडून होत असतो. पण तुम्ही जर आज मतदान केले नाही, तर त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल, सरकार नाही.”

मतदानाच्या अधिकाराबाबत बोलत असताना मतदान न करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, असेही त्यांनी सुचविले. “जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना काही ना काही तरी शिक्षा दिलीच पाहीजे. एकतर त्यांच्यावरील कर वाढवावा किंवा इतर काहीतरी तरतूद करावी”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Praniti Shinde First Speech in Loksabha on Maratha Reservation
प्रणिती शिंदे यांचं लोकसभेत पहिलंच भाषण; मराठा आरक्षणावरून राज्य आणि केंद्रावर केली टीका, म्हणाल्या…
Mav leaders bjp Campaigning convention ajit pawar mahayuti
मविआ नेते लक्ष्य; भाजप अधिवेशनात प्रचाराची दिशा स्पष्ट, ‘संभ्रमा’तील कार्यकर्त्यांना संदेश
director general of police asked report on trainee ias pooja khedkar case
पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल पोलीस महासंचालकांनी मागविला
Union Minister Nitin Gadkari Goa Speech
नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”
Former opposition leader Ravi Raja alleged that the claims of the municipality were false Mumbai
पालिकेचे दावे फोल; माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप
rahul gandhi letter to yogi adityanath
हाथरस दुर्घटनेप्रकरणी राहुल गांधींचं योगी आदित्यनाथ यांना पत्र; म्हणाले, “उत्तर प्रदेश सरकारने…”
Arvind Kejriwal News
अरविंद केजरीवाल यांचे सीबीआयवर गंभीर आरोप, “माझा छळ करण्यात आला, सुटका होऊ नये म्हणून..”
shrikant shinde loksabha first speech
Parliament Session 2024 : १८व्या लोकसभेतील पहिल्याच भाषणात श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल; म्हणाले….

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज महाराष्ट्रातील १३ मतदारसंघात मतदान होत आहे. मुंबई सारख्या शहरात कोट्यवधी मतदारांना विनासायास मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली होती. मात्र मुंबईत अनेक ठिकाणी मतदारांनी गैरसोयीबाबत तक्रारी व्यक्त केल्या. ईव्हीएममध्ये बिघाड, वीजपुरवठा खंडीत होणे, अशा अनेक समस्या मुंबईकरांना मतदानाबाबत भेडसावत होत्या.

दक्षिण, दक्षिण मध्य, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व आणि उत्तर मध्य या सहा मतदारसंघात आज मतदान होत आहे. तर उर्वरीत महाराष्ट्रातील धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी आणि ठाणे या मतदारसंघातही मतदान होत आहे.

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक ४८ लोकसभा मतदारसंघ असलेले राज्य आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकूण ८.९५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी ४.६९ कोटी पुरुष आणि ४.२६ कोटी महिला मतदार आहेत. तर ५४०९ तृतीयपंथी मतदार आहेत. पाचव्या टप्यात एकूण ६९५ उमेदवारांचे नशीब आज मतपेटीत बंद झाले आहे.