“सम्या विशु या जोडीच्या यशात बहुतांश वाटा…”, समीर चौगुलेंची विशाखा सुभेदारसाठी खास पोस्ट

या पोस्टसोबतच समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

“सम्या विशु या जोडीच्या यशात बहुतांश वाटा…”, समीर चौगुलेंची विशाखा सुभेदारसाठी खास पोस्ट

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील समीर चौगुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, नम्रता संभेराव यासारखे अनेक विनोदवीरांचे निखळ मनोरंजन करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून समीर चौगुलेंना ओळखले जाते. नुकतंच समीर चौगुलेंनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टद्वारे अभिनेत्री विशाखा सुभेदार हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून विशाखा सुभेदारला ओळखले जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. आज विशाखा सुभेदारचा वाढदिवस आहे. तिच्या या वाढदिवसानिमित्त समीर चौगुलेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

समीर चौगुलेंची खास पोस्ट

Vishakha Subhedar विशु …वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…. विलक्षण आणि विस्मयकारक ताकदीची कलावंत…अफाट आणि अचाट टायमिंग गाठीशी ठेऊन रंगमंचावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री….विनोदाची उत्तम समज आणि क्षणार्धात कमालीचे भाव चेहऱ्यावर आणून प्रेक्षकांना अचंबित करणारी आमची विशु….माझं भाग्य की ही अतरंगी बहुगुणी माझी जोडीदार आहे आणि माझी सखी मैत्रीण आहे…

“सम्या विशु” या जोडीच्या यशात बहुतांशी वाटा विशुचा आहे…आतून प्रेमळ माऊली असलेल्या आमच्या विशुत कुशल कठोर नेतृत्वगुण ही दडलेले आहेत आणि याच गुणांमुळे ती आज उत्कृष्ट नाट्यनिर्माती म्हणून घट्ट पाय रोवतेय…..विशु तुझं माझ्या बरोबर असणं भाग्याचं आणि आनंदाचं आहे. जे मनात आहे ते सगळं तुला मिळो ही गणराया चरणी प्रार्थना………वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….., असे समीर चौगुले म्हणाले.

“तुमचा नवरा कोणत्या…”, अभिनेत्री क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

या पोस्टसोबतच समीर चौगुलेंनी विशाखा सुभेदारसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावरील आहे. समीर चौगुलेंनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तसेच त्यांच्या या पोस्टवर अनेक कमेंट आणि लाईक्सही पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी