पाकिस्तान सिनेसृष्टी ही आधीपासूनच बॉलिवूडची चाहती राहिली आहे. लवकरच आता महेश भट्ट यांच्या सुपरहिट ‘अर्थ’ सिनेमाचे पाकिस्तानमध्ये रिमेक होणार आहे. पाकिस्तान सिनेसृष्टीकडून हिंदी सिनेमाचा रिमेक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देव आनंद यांच्या भावासोबत ही अभिनेत्री होती लिव्ह इनमध्ये; निर्दयीपणे झाली होती तिची हत्या

या सिनेमाशी निगडीत सर्व तयारी झाली असून ‘अर्थ’ सिनेमाच्या रिमेकसाठी स्टारकास्टही निवडण्यात आली आहे. पाकिस्तानमधील अभिनेता शान शाहिद या सिनेमात राज किरणची भूमिका निभावताना दिसेल. तर पाकिस्तानी सिनेमात हुमायमा मलिक ही स्मिता पाटीलची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. या दोघांशिवाय उज्मा हसन आणि मोहबीब मिर्झा खरबंदा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हमद चौधरी या सिनेमाची निर्मिती करणार असून ‘अर्थ २’ असे या सिनेमाचे नाव असणार आहे. ‘अर्थ २’ मध्ये आधुनिक पाकिस्तान दाखवण्यात येणार आहे.

ar-pak-2

सुरूवातीला हा सिनेमा २०१५ मध्येच प्रदर्शित करण्याचा मानस दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा होता. पण आता हा सिनेमा येत्या डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे दोन वर्ष लांबलेल्या या सिनेमाला पाकिस्तानी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.

डॅडींकडून सगळ्यांना ईद मुबारक

दरम्यान, पाकिस्तानमध्ये जेव्हाही बॉलिवूड सिनेमांचे प्रदर्शन असते तेव्हा काही सिनेमांना कडाडून विरोध केला जातो. तसेच बॉलिवूडमध्ये जर बिग बजेट सिनेमे जरी प्रदर्शित होणार असतील तर ते लगेच पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करायचे की नाही याचा विचार केला जातो. सलमान खानच्या ‘ट्युबलाइट’चेच पाहा ना… पाकिस्तानमध्ये हा सिनेमा लगेच प्रदर्शित करण्यात आलेला नाही. कारण त्याच दरम्यान पाकिस्तानात दोन बिग बजेट सिनेमे प्रदर्शित होणार होते. जर सलमानचा ‘ट्युबलाइट’ त्याचवेळी प्रदर्शित केला तर त्या दोन सिनेमांवर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून वितरकांनी ‘ट्युबलाइट’ सिनेमा तुर्तास तरी प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता.