चित्रपट समिक्षक व प्रेक्षकांकडून दाद मिळवणारा ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. या पुरस्कार स्पर्धेसाठी देशभरातील २७ चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला आहे. फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करणार आहे. या चित्रपटाची कथा दक्षिण भारतात खेळल्या जाणाऱ्या जलिकट्टू या खेळावर आधारित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – ‘नग्न असताना मला अधिक आध्यात्मिक वाटतं’; टीकाकारांवर सोफिया संतापली

अवश्य पाहा – ‘तुरुंगातून सुटताच सूड घेईन’; अभिनेत्रीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑक्टोंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात Antony Varghese, Chemban Vinod Jose, Santhy Balachandran, Jaffar Idukki यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी काम केलं आहे. जबरदस्त पटकथा आणि अभिनय यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करुन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. लक्षवेधी बाब म्हणजे अनेक पाश्चात्य समिक्षकांनीही या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली होती. परिणामी ‘फिल्म फेडरोशन ऑफ इंडिया’नं ऑस्कर स्पर्धेसाठी या ‘जलिकट्टू’ची निवड केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malayalam film jallikattu is indias entry for oscars 2021 mppg
First published on: 25-11-2020 at 16:33 IST