अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. लग्न करण्यास नकार दिल्याने संबंधित आरोपीने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. ‘झी न्यूज इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी योगेश महिपाल सिंग याने आधी मालवीची दोन-तीन वेळा भेट घेतली होती. निर्माता असल्याचं सांगत त्याने मालवीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लग्नाची मागणी घातली. मालवीने लग्न करण्यास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला. सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास वर्सोवा परिसरात मालवीवर हल्ला करण्यात आला. कॅफेमधून घरी परतत असताना तिच्यावर योगेशने हल्ला केला.

‘एबीपी न्युज’नुसार, झालेल्या हल्ल्यात मालवीच्या शरीरावर चाकूने तीन वार करण्यात आले आहेत. याप्रकरणानंतर मालवीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या मालवीची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात देखरेखीखाली आहे.

 

View this post on Instagram

 

Colours makes me smile#candid #beyou #malvimalhotra

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by Malvi Malhotra (@malvimalhotra) on

दरम्यान, मालवीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच तिने तेलुगू, मल्याळम चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. अलिकडेच तिची उडान ही मालिका विशेष गाजली होती.