वयाच्या ४९व्या वर्षीही फिट, मंदिरा बेदीचा वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल

आजही मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणून पाहिले जाते

mandira bedi,

वयाच्या ४९व्या वर्षीही तितकीच हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मंदिरा बेदी. ‘शांती’ मालिकेपासून ते ‘क्यों की सास भी कभी बहुती’ मालिकेपर्यंत मंदिराने छोट्या पडद्यावर जादू केली होती. आजही मंदिरा बेदीकडे फिटनेस आयकॉन म्हणून पाहिले जाते. ती सतत वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकताच मंदिराने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती हँडस्टँड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘हे माझे रोजचे रुटीन आहे. कधी १० तर कधी २० आणि मला आशा आहे की एक दिवस मी या पेक्षा जास्त करने. पण घाई गडबडीत नाही’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : अंडरवर्ल्डचा ‘तो’ कॉल ठरला संजय दत्त आणि गोविंदाच्या मैत्रीला तडा जाण्याचे कारण

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

सध्या सोशल मीडियावर मंदिराचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. अनेकजण तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत तिची प्रशंसा करताना दिसत आहेत. मंदिराचा चाहता वर्ग मोठा आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास १.५ मिलियन फॉलोअर्स आहेत.

लवकरच मंदिरा एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये ती एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. १९९४ साली मंदिराने ‘शांती’ या मालिकेतून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. तसेच तिने दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत ‘साहो’ या चित्रपटात देखील काम केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mandira bedi shares her handstand video viral avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या