यावर्षीचा बहुचर्चित चित्रपट ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. अभिनेत्री कंगना रणौत हिची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या झाशीच्या राणीची शौर्यगाथा सांगण्यात आली आहे. देशभरातील जवळपास ३००० स्क्रिन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई किती झाली याबद्दलची उत्सुकता अनेकांना असेलच. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘मणिकर्णिका’च्या कमाईचे आकडे सांगितले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या दिवशी कंगनाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ८.७५ कोटींचा गल्ला जमवला आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘ठाकरे’ या चित्रपटाची स्पर्धा कंगनासोबत होती. शुक्रवारी ‘ठाकरे’ आणि ‘मणिकर्णिका’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले. या दोन्ही चित्रपटांची खूप चर्चा होती आणि प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती.

कंगनाच्या चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. कंगनासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा आहे. कारण त्याचं दिग्दर्शनसुद्धा तिने केलं आहे. कंगना व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी, वैभव तत्त्ववादी यांसारखे मराठी कलाकारही या चित्रपटात आहेत. येत्या काळात हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manikarnika box office collection day 1 kangana ranaut film took off to a fantastic start
First published on: 26-01-2019 at 13:24 IST