scorecardresearch

Premium

मनिषाच्या ‘या’ ट्विटमुळे कॅन्सरग्रस्त सोनालीला मिळाला आधार

काही कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेत तिला पाठिंबा दिला.

मनिषाच्या ‘या’ ट्विटमुळे कॅन्सरग्रस्त सोनालीला मिळाला आधार

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेने काही दिवसापूर्वी तिला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. सोनालीच्या या धक्कादायक माहितीमुळे कलाविश्वात एक प्रकारची खळबळ माजली असून सध्या सोनाली न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. यावेळी सोनालीला अनेकांनी मानसिक आधार दिला असून नुकतंच मनीषा कोइरालानेदेखील ट्विटरच्या माध्यामातून तिला आधार दिल्याचं पाहायला मिळात आहे.

‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या सोनालीने कॅन्सरची माहिती दिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसल्या. त्यामुळे अभिनेता अक्षयकुमारनेही तातडीने न्युयॉर्कला जात सोनालीची भेट घेतली. तर काही कलाकारांनी सोशल मीडियाचा आधार घेत तिला पाठिंबा दिला.

सोनालीपूर्वीही काही बॉलिवूड कलाकारांना कॅन्सर झाल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यातील काही कलाकारांनाच या कॅन्सरशी दोन हात करण्यास यश आले. त्यातलंच एक नाव मनिषा कोइराला. मनिषाला ओव्हरीजचा कॅन्सर झाला होता. मात्र यावर तिने यशस्वीरित्या मात केली. त्यामुळे सध्या सोनालीचं दु:ख काय आहे हे जाणून तिने सोनालीसाठी ट्विट केलं.

‘सोनाली तु लवकरात लवकर ठिक होशील. देव सदैव तुझ्या पाठिशी आहे. पटकन बरी हो आणि लवकर घरी ये’. अशा आशयाचं ट्विट मनिषाने केलं आहे. विशेष म्हणजे उपचार घेत असतानादेखील सोनाली प्रत्येक व्यक्तीच्या ट्विट, मेसेजची उत्तरं देताना दिसून येत आहे.

मनिषाच्या ट्विटरवर सोनालीने तातडीने उत्तर देत, ‘धन्यवाद मनिषा. माझ्या लढ्यामध्ये तूच माझी प्रेरणा आहे. तुझ्या प्रेरणेमुळे मी या संघर्षाशी लढा देत आहे’ असं ट्विट सोनालीने केलं आहे. दरम्यान, मनिषाच्या ट्विटनंतर अभिनेत्री दिव्या दत्तानेही सोनालीसाठी ट्विटरवर पोस्ट केली आहे.ज्यामुळे सोनाली भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Manisha koirala special message to sonali bendre

First published on: 07-07-2018 at 17:54 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×