सेलिब्रिटींमध्ये ‘फ’च्या बाराखडीचं इतकं वेड का आहे हे अमेय वाघची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फास्टर फेणे’ या चित्रपटाचा दुसरा टीझर पाहूनच लक्षात येते. ‘फास्टर फेणे’ चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये ‘फास्टर फेणे’ नेमका आहे तरी कोण आणि तो करतोय तरी काय याची एक झलक दाखवण्यात आलीये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दमदार पार्श्वसंगीताची झलक आणि कमालीची उत्सुकता जागवणाऱ्या या टीझरमध्ये अमेय आपल्या भेटीला येतो ते म्हणजे ‘बनेश फेणे’च्या रुपात. नेहमीच विविध भूमिका साकारण्याला प्राधान्य देणारा अमेय ‘फास्टर फेणे’मध्ये साहसी दृश्य करताना दिसणार आहे. त्याचीच झलकही या टीझरमधून पाहायला मिळते. ‘स्मार्ट नव्या दुनियेला साहसी हे देणे, नव्या रुपात नव्या कथेत आला फास्टर फेणे’, अशी त्याच्या भूमिकेची ओळख देण्यात आल्यामुळे त्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचणं साहजीकच आहे. हा चित्रपट आणखी एका कारमुळे चर्चेत आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची निर्मिती. रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख यांची नावंही चित्रपटाशी जोडली गेली आहेत. रितेशने त्याच्या फेसबुक पेजवरुन चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

‘झी स्टुडिओज’च्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला असून, ‘सॉलिड डोकं, शोधक नजर, श्वास रोखून बघा, आलाय नवा टीझर’, असं कॅप्शनही दिलेलं आहे. ‘फास्टर फेणे’च्या नावाला मिळालेली लोकप्रियता आता या चित्रपटालाही मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलं होतं. ‘बनेश’ उर्फ ‘फास्टर फेणे’च्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. तेव्हा आता तुम्हालाही या नव्या अंदाजातील ‘बनेश’ला भेटायचं असेल तर, २७ ऑक्टोबरपर्यंतची वाट पाहावी लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor amey wagh starrer faster fene movie second teaser out
First published on: 23-09-2017 at 16:39 IST