मराठी चित्रपटसृष्टीत आता लगीनघाईचे वारे वाहू लागले असून, अभिनेत्री प्रार्थना बेहरे पाठोपाठ आता सानिका अभ्यंकरनेही आयुष्यातील एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सानिका नुकतीच लग्नबंधनात अडकली असून सोशल मीडियावर या सोहळ्याची क्षणचित्रे पाहायला मिळाली.
जुलैमध्ये सानिकाचा साखरपुडा झाला तेव्हादेखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले होते. मात्र त्यावेळी पतीचं नाव तिने सर्वांसमोर उघड केलं नव्हतं. सानिकाच्या या ‘मिस्टर परफेक्ट’ची ओळख अजूनही गुलदस्त्यातच आहे, असं म्हणावं लागेल. सानिकाची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री चैत्राली गुप्तेने तिच्या इन्स्टाग्रामवर सानिकाचा लग्नानंतरचा फोटो पोस्ट केला आहे.




https://www.instagram.com/p/BbeFbpEF42B/
https://www.instagram.com/p/BbR0hDpFHsY/
वाचा : शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा गरोदर?
दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची मुलगी म्हणून तर सानिकाची ओळख आहेच. पण, तिने स्वत:च्या कर्तृत्वाने या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलीये. मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका, नृत्यांगना अशी तिची ओळख खऱ्या अर्थाने अनेकांच्या मनावर छाप पाडतेय.