Photos: दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलेल्या श्री. व सौ. गणेशपुरेंचे फोटो पाहिलेत का?

बुधवारी संध्याकाळी गोरेगाव इथं हा लग्नसोहळा पार पडला.

bharat ganeshpure
Photos: दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधलेल्या श्री. व सौ. गणेशपुरेंचे फोटो पाहिलेत का?

अभिनेता भारत गणेशपुरे यांनी बुधवारी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. आपल्या पत्नीसोबतच त्यांनी पुन्हा लग्न केलं. गोरेगाव इथल्या त्यांच्या राहत्या घरीच हा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याला काही कलाकारसुद्धा उपस्थित होते.

‘चला हवा येऊ द्या’च्या टीमसोबत जगप्रवासाला निघालेल्या भारत यांना कुटुंबीयांसोबत, पत्नीसोबत पुरेसा वेळ व्यतित करता आला नाही. शिवाय नव्या घरात शिफ्ट झाल्यापासून नातेवाईकांशीही भेटणं-बोलणं जमलं नाही. व्यग्र कामकाजातून वेळ काढत सगळ्यांना एकत्र बोलवायचं कसं, असा प्रश्न त्यांना पडला. त्यावर तुम्ही पुन्हा एकदा लग्न करा म्हणजे सगळेजण पुन्हा एकत्र येतील, असं गमतीशीर उत्तर श्रेया बुगडेनं दिलं आणि भारत यांनी हे चांगलंच मनावर घेत थेट लग्नाचा मुहूर्त काढला.

मंगळवारी हळदीचा कार्यक्रम पार पडला आणि बुधवारी संध्याकाळी भारत गणेशपुरे पुन्हा एकदा बोहल्यावर चढले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi actor bharat ganeshpure second time tied the knot