‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘थरथराट’, ‘दे दणादण’ अशा सुपरहिट चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली तो अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे. मोठ्या पडद्यावर अमाप यश मिळविल्यानंतर महेश कोठारे आता छोट्या पडद्याकडे वळले आहेत. लवकरच त्यांची ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने २१ ऑक्टोबर रोजी लोकसत्ता डिजिटल अड्डावर त्यांची खुमासदार मुलाखत रंगणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या बुधवारी,२१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ही मुलाखत रंगणार आहे. त्यामुळे या खुमासदार मुलाखतीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या.

यावेळी तुम्हीदेखील तुमच्या मनातले प्रश्न त्याला विचारु शकता. त्यामुळे न विसरता २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये नक्की सहभागी व्हा आणि तुमचे प्रश्न विचारा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor director mahesh kothare special interview on loksatta digital adda ssj
First published on: 20-10-2020 at 10:37 IST