मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुमीत राघवनला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सुमीत राघवनने नुकतंच एक ट्वीट केले आहे. याद्वारे त्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.

सुमीत राघवन हा सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो. नुकतंच त्याने ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने नवीनच सुरु झालेल्या मेट्रोतून प्रवास केला आहे. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओही त्याने शेअर केले आहेत. यातील एका फोटोत सुमीत हा गुंदवली ते अंधेरी पश्चिम या मेट्रोतून प्रवास करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याने स्वत:चा सेल्फी आणि मेट्रोचा एक फोटोही शेअर केला आहे.
आणखी वाचा : सचिन तेंडुलकरने केलेल्या ‘त्या’ ट्वीटवर सुमित राघवनची कमेंट, म्हणाला “आम्ही थकलो…”

याबरोबरच त्याने एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओ त्याने मेट्रो प्रवासाची झलकही दाखवली आहे. विशेष म्हणजे तो प्रवास करत असलेली मेट्रोही रिकामी असल्याचेही दिसत आहे. या ट्वीटला त्याने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

“गणपती बाप्पा मोरया. मी एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणेच मला वाटतंय. मुंबईकरांसाठी हे सर्वोत्तम गिफ्ट आहे. धन्यवाद देवेंद्र फडणवीस”, असे कॅप्शन सुमीत राघवनने दिले आहे. त्याबरोबर त्याने ‘मेट्रो मॅन देवेंद्र’ आणि ‘मुंबई मेट्रो झिंदाबाद’ असे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

आणखी वाचा : “तुमच्यासाठी…” ट्विंकल खन्नाशी होणाऱ्या तुलनेबद्दल रवीना टंडन स्पष्टच बोलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सुमीतने केलेल्या ट्विटवर अनेकजण प्रतिक्रिया देताना दिसत आहे. अनेकांनी त्याच्या या ट्वीटवर कमेंट करत त्याला विविध प्रश्नही विचारले आहेत. सध्या त्याचे हे ट्वीट व्हायरल होताना दिसत आहे.