अभिनेत्री मिथिला पालकर हिला ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखले जाते. मिथिला ही नेहमी तिच्या अभिनयासह बोल्ड अंदाजासाठीही ओळखली जाते. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. नुकतंच मिथिलाने एका गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिथिला ही नेहमीच सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अवघ्या चार तासांपूर्वी मिथिलाने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यावेळी ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यात तिने एक मिनी ड्रेस परिधान केला आहे. तो ड्रेस घालून ती नाचताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
elder woman dancing on gulabi sadi viral video
‘गुलाबी साडी अन् लाली लाल लाल’ ट्रेंडवर आजीबाईंनी केला भन्नाट डान्स; पाहा हा व्हायरल Video….

तिचा हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने ‘ताई नेमकं काय करायचं आहे?’ अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकऱ्याने  ‘काय झालंय तुला? तू बरी आहेस का?’ अशी कमेंट केली आहे. तर काहींनी ‘बिचारीवर काय वेळ आली आहे?’ अशा अनेक तिच्या या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहे.

मिथिला पालकर ही काही दिवसांपूर्वीच ‘कारवां’ या चित्रपटातून झळकली होती. इरफान खान आणि दलकीर सलमान या अभिनेत्यांसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. मिथिला ही कप साँगमुळे घराघरात पोहोचली. त्यानंतर लिटिल थिंग्ज या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यानंतर ती बिंदास ओरिजिनल्सच्या ‘गर्ल इन द बिग सिटी’ मध्ये दिसली होती.