‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. तिचा मालिकांपासून सुरु झालेला प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला. ‘मोकळा श्वास’,’शिकारी’,’फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली. मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. मन फकीरा या चित्रपटाचं तिने पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे. मात्र या चित्रपटामुळे तिला एका गोष्टीचा त्याग करावा लागला.

नुकताच ‘मन फकीरा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने मृण्मयीने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’ला उपस्थिती दर्शविली होती. यावेळी तिने चित्रपटासाठी कोणता त्याग करावा लागला हे सांगितलं.

वाचा : अनुपम खेर यांनी किरण यांना अशी घातली लग्नाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मन फकीरा’मध्ये रिया या भूमिकेमध्ये अभिनेत्री सायली संजीव झळकली आहे. मात्र ही भूमिका प्रथम मृण्मयी करणार होती. रिया ही व्यक्तिरेखा रेखाटत असताना मृण्मयी सतत रियामध्ये स्वत:ला पाहत होती. मात्र एका कारणामुळे तिला ही भूमिका करता आली नाही. त्यामुळेच तिने सायली संजीवची या भूमिकेसाठी निवड केली.