उत्तम अभिनय आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. कमी कालावधीत लोकप्रियतेचं शिखर गाठणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. त्यामुळे अनेकदा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा ती प्रयत्न करत असते. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यांची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

अभिनयाव्यतिरिक्त प्राजक्ता तिच्या नृत्यकौशल्यामुळेही चर्चेत असते. अनेकदा ती तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर दिसून येत आहे.


“जेव्हा एखादं चित्रीकरण पुढे ढकललं जातं आणि तुमच्या आसपास फुलवा आणि तिची टीम असेल तर तुम्ही डान्स केल्याशिवाय कसं काय राहू शकता”, असं म्हणत प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

पाहा फोटो >> अशी रोखा नजर…त्यात भरलं जहर; प्राजक्ता माळीच्या या अदा पाडतील तुम्हाला प्रेमात

दरम्यान, कजरा महोब्बतवाला, या गाण्यावर फुलवा आणि प्राजक्ताने ताल धरला असून त्यांचा हा व्हिडीओ लोकप्रिय ठरत आहे. प्राजक्ता सध्याच्या घडीला लोकप्रिय अभिनेत्री आहे. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आणि प्रसिद्धीझोतात आली.