भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दिग्दर्शक एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाने इतिहास रचला. ‘बाहुबली’ चित्रपटाचे गारूड, त्याचा प्रभाव यामुळे प्रत्येकजण हरखून गेला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, भव्यदिव्य सेट आणि त्याला उत्तुंग कलात्मक स्वरूप हे बाहुबलीच्या यशाचे मापदंड ठरले. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे.

अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी सांभाळली आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार याच्याशी जोडले जाणार आहेत.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

या मराठी बाहुबली चित्रपटाचे लेखन स्नेहल तरडे यांनी केलं आहे. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी बाहुबलीला आवाज दिला आहे. विशेष म्हणजे देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. त्यासोबतच मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस यासारख्या दिग्गज कलाकारांनी बाहुबालीमधील इतर पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे.

कौशल इनामदार यांनी याचे संगीत दिग्दर्शन केले असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.

दमदार मराठमोळा ‘बाहुबली’ दिवाळीच्या निमित्ताने गुरुवार ४ नोव्हेंबरला प्रक्षेपित होणार आहे. दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ७.०० वा. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’ वर प्रेक्षकांना मराठी बाहुबली पाहता येणार आहे. त्यामुळे या मराठमोळया बाहुबलीचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.