बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चोर पोलीसचा खेळ रंगला. लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळले पण हा उत्कंठावर्धक खेळ आपण गंमत म्हणून खेळला असला तरी आता घरामध्ये मात्र या खेळामुळे अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती. या खेळादरम्यान झालेल्या काही गोष्टींमुळे मेघा आणि स्मितामध्ये भांडण होणार आहे. ज्याचे कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिग बॉसच्या घरामध्ये काल चोर पोलीसचा खेळ बराच वेळ रंगला असून घरातील काही सदस्यांमध्ये म्हणजेच मेघा, उषाजी आणि रेशममध्ये काही कारणांमुळे वाद होणार आहेत. ज्यामध्ये रेशमने उषाजींना बजावले आहे की, मागून बोलण्यापेक्षा मला समोरून बोललेलं जास्त आवडेल. या तिघांमध्ये झालेला हा वाद कुठल्या टोकापर्यंत गेला? मेघा आणि स्मिता मध्ये वाद का झाला आणि बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये रहिवाश्यांना यश मिळेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या भागामध्ये मिळणार आहेत.

आजच्या भागामध्ये बिग बॉसच्या घरातील रहिवाश्यांना बिग बॉस गार्डन परिसरात एका लाल रंगाच्या चौकटीमध्ये उभे रहाण्यास सांगणार असून, त्या चौकटी बाहेर जाण्यास सदस्यांना सक्त मनाई आहे. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद राहणार आहे आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे. तसेच दिवसाअखेरीस घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधी पर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असेदेखील बिग बॉस सूचित करणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा आजचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi big boss todays special day
First published on: 04-05-2018 at 21:30 IST