अभिनेता भूषण प्रधानने आपल्या दमदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतील तो सध्याचा आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. लवकरच त्याचा ‘जुनं फर्निचर’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामुळे भूषण सध्या चर्चत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२६ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात भूषण व्यतिरिक्त महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, उपेंद्र लिमये, अनुषा दांडेकर या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. गिरगावातील गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत या चित्रपटाचं प्रमोशन करताना कलाकार मंडळी दिसले. यावेळी भूषण व अनुषा दांडेकरचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला.

हेही वाचा – स्पिरिट ऑफ एक्स्टसी सोन्याचं अन्…; नीता अंबानींनी खरेदी केली आलिशान गाडी, जाणून घ्या किंमत

अनुषाने सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमधील भूषणसहचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “अवनी व अभयला या नव्या वर्षात भेटा.” या फोटोमध्ये भूषण ऑफ व्हाइट रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर अनुषा नऊवारी साडीत पाहायला मिळत आहे. दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

भूषण व अनुषाचे फोटो पाहून नेटकरी लग्नाचा सल्ला देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “प्लीज तुम्ही लग्न करा. तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “तुम्ही दोघं एकमेकांशी लग्न करणार आहात, याची पुष्टी झाली. खूप वेगळं वाटतं आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “छान जोडी आहे…लग्न करायला हरकत नाही.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “खूप सुंदर जोडी आहे. प्लीज दोघांनी लग्न करा.”

हेही वाचा – ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील अभिनेता अडकला लग्नबंधनात, कोण आहे बायको? जाणून घ्या…

दरम्यान, भूषण व अनुषाच्या ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद याची धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. एवढंच नव्हे तर ते चित्रपटात गायले देखील आहेत. २६ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After seeing bhushan pradhan photos with famous actress anusha dandekar netizens suggested marriage pps
First published on: 11-04-2024 at 07:30 IST