scorecardresearch

‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकचा गौरव, पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाला “एक ब्लॅक लेडी…”

त्याबद्दल त्याने एक खास फोटो शेअर केला आहे.

prasad oak
प्रसाद ओक

अभिनेता प्रसाद ओक हा कायमच चर्चेत असतो. प्रसाद ओकला कायमच त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखले जाते. गेल्यावर्षी त्याचा ‘धर्मवीर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. नुकतंच या चित्रपटासाठी प्रसाद ओकला फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले आहे. याबद्दल त्याने पोस्ट शेअर केली आहे.

नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराचा रंगतदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावेळी प्रसाद ओकला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्याने एक खास फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : महेश मांजरेकरांची लेक गौरी इंगावलेला मिळाला फिल्मफेअर पुरस्कार, सत्या मांजरेकर म्हणाला “तुझे खूप…”

प्रसाद ओकची पोस्ट

“अजून एक BLACK LADY घरात…!!!
ती पण अशा LADY च्या हातून
जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS अश्विनी भावे.

पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम धर्मवीर, मंगेश देसाई आणि अर्थातच प्रविण तरडे…!!!

धन्यवाद फिल्मफेअर

दुसरा फोटो
दोन BLACK LADIES चा…!!!”, अशी पोस्ट प्रसाद ओकने केली आहे.

त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. अभिनेता जितेंद्र जोशी याने या पोस्टवर ‘अभिनंदन’ अशी कमेंट केली आहे. तर ऋतुजा बागवेने ‘हार्ट’ इमोजी शेअर केला आहे. त्याबरोबर अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट केली आहे. तिने “बघ मी म्हटलं होतं!!! केलंय न regret! मंजिरी ओक, प्रसाद ओक अभिनंदन”, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 18:55 IST

संबंधित बातम्या