राज्यात मराठा जातीचे सर्वेक्षण सुरू आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन जातीय आधारित माहिती गोळा करत आहेत. अभिनेत्री केतकी चितळे व अभिनेता पुष्कर जोग यांच्याकडे जातीय गणना करण्यासाठी बीएमसीच्या महिला कर्मचारी आल्या होत्या. जात विचारण्याबद्दल या दोघांनी आक्षेप घेत आपापल्या सोशल मीडिया हँडलवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. पुष्कर जोगने ती महिला कर्मचारी नसती तर दोन लाथा मारल्या असत्या असं विधान केलं होतं. यावरून वातावरण चांगलंच पेटलंय. किरण माने यांनी पोस्ट करत या दोघांवर टीका केली होती, त्यानंतर एका मुलाखतीतही प्रतिक्रिया दिली आहे.

केतकी चितळेबद्दल बोलताना किरण माने म्हणाले, “मला जात का विचारता? याबद्दल जर तिने सरकारला सवाल केला असता तर ते मत व्यक्त करणं झालं असतं. त्या कर्मचाऱ्याला त्याची जात विचारायची, त्यातून अ‍ॅट्रोसिटीचा टोमणा मारायचा, हा जातीयवाद नाही का? त्यानंतर माझी ही जात अजिबात नाही, असं म्हणत स्वतःची जात सांगताना एक पोकळ अभिमान दाखवायचा, ज्या जातीचा अभिमान वाटायचं कुठलंही कारण नाही. तसा इतिहासही नाही. मग त्यावर ऑब्जेक्शन घेतो ना आपण. मत मांडणं वेगळं आणि दुसऱ्या जातीला कमी लेखणं वेगळं.”

“लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा?” पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टवर किरण मानेंचे आव्हान; म्हणाले, “नेत्यांचे पाय चाटणारी जमात…”

‘पुढारी’शी बोलताना पुढे ते म्हणाले, “यातील सुप्त स्वर ऐका तुम्ही त्यांचे. स्वतःची जात सांगताना किंवा जोग कानाखाली मारतील हे म्हणताना त्यात सुप्त राग आहे तो तुम्ही समजून घ्या. आमची आडनावं बघून तुम्हाला आमची जात कळत नाही? आणि तुम्ही आम्हाला काय जात विचारायला येता? हा एक वर्चस्ववाद असतो. त्यात आणखी एक हाही राग आहे की या संविधानाने आपलं वर्चस्व मोडीत काढलं गेलंय. तो एक राग आहे, तो राग सगळा यातून दिसतो.”

“चितळ्यांची केतकी व जोगांचा पुष्कर…”, जातीसंदर्भातील पोस्टवरून राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका; म्हणाले, “कानाखाली मारायची…”

केतकी चितळे काय म्हणाली होती?

“या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान कायदा, समान नियम नाहीत. आज ज्या दिवशी भारत सार्वभौम प्रजासत्ताक झाला, त्या दिवशी महानगरपालिका भेदभाव करण्यासाठी लोकांना घरी पाठवून, दारं ठोठवून जात विचारत आहे. अब गाओ संविधान, संविधान,” असं केतकी व्हिडीओ शेअर करत म्हणाली होती.

“…तर २ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी; म्हणाला, “बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल…”

View this post on Instagram

A post shared by Ketaki Chitale (@epilepsy_warrior_queen)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

दरम्यान, त्याने केलेल्या विधानानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पुष्कर जोगने दिलगिरी व्यक्त केली. “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते,” असं पुष्कर म्हणाला.