मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार अशोक सराफ यांना प्रदान करण्यात येणार आहे. ‘चौकट राजा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य चित्रपटांमधून अशोक सराफ यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांचा सन्मान केला जाणार आहे. पुरस्कार मिळण्यापूर्वी अशोक सराफ व निवेदिता सराफ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हेही वाचा : श्रद्धा कपूर झाली आत्या! पद्मिनी कोल्हापूरेंच्या सुनेनं दिली गोड बातमी, घरी झालं नव्या पाहुणीचं आगमन

निवेदिता सराफ राजश्री मराठीशी संवाद साधताना म्हणाल्या, “आमचे सर्व आज कुटुंबीय आमच्याबरोबर आहेत. माझ्या माहेरचे- सासरचे असे सगळेजण या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित आहे. आम्हा कुटुंबीयांसमोर अशोक हा पुरस्कार स्वीकार असल्याने मला फार आनंद होतो आहे. काही दिवसांपूर्वी हा पुरस्कार जाहीर झाल्यावर प्रत्येकजण आनंदी होता मला वाटतं हेच अशोकचं सर्वात मोठं यश आहे.”

हेही वाचा : ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचे पोस्टर चर्चेत

अशोक सराफ माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “या क्षणाला मला नंबर १ झाल्यासारखं वाटतंय. आपल्या कार्यभूमीत असं कौतुक होणं ही प्रत्येकासाठीच खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आजच्या लूकचं पूर्ण श्रेय निवेदिताचं आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा प्रसंग आहे. माझ्यासाठी हा खूप मोठा सत्कार आहे असं मी समजतो.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra bhushan ceremony ashok saraf wife nivedita saraf first reaction before receiving award sva 00
First published on: 22-02-2024 at 21:58 IST