बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मावस भाऊ प्रियांक शर्मा आणि त्याची पत्नी शाझा मोरानी आई-बाबा झाले आहेत. प्रियांक व शाझाच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. प्रियांक हा श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा आहे. लाडक्या भावाच्या घरी लक्ष्मीचं आगमन झाल्यामुळे श्रद्धा आता आत्या झाली आहे.

प्रियांक शर्मा हा मराठीसह बॉलीवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे आणि निर्माते प्रदीप शर्मा यांचा मुलगा आहे. तर, शाझा ही करीम व झारा मोरानी यांची लेक आहे. या दोघांचा विवाहसोहळा २०२१ मध्ये पार पडला होता. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.

हेही वाचा : …अन् भारती सिंह थक्क झाली! सांगितला माधुरी दीक्षितच्या लेकाचा खास किस्सा; म्हणाली, “सेटवर त्याने…”

श्रद्धा कपूरने जानेवारी महिन्यात पार पडलेल्या शाझाच्या डोहाळे जेवणाला खास उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. श्रद्धाने लिंबू रंगाचा ड्रेस, नाकात नथ, केसात गजरा असा पारंपरिक लूक केला होता.

हेही वाचा : आली समीप लग्नघटिका! ‘असं’ पार पडलं पूजा सावंतचं व्याही भोजन, अभिनेत्रीच्या सासरी कोण-कोण असतं?

प्रियांक-शाझाला लेक झाल्याने श्रद्धा आत्या, तर अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे आजी झाल्या आहेत. नव्या बाळाचं आगमन झाल्याने सध्या शर्मांसह कपूर कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, मार्च २०२१ मध्ये प्रियांक शर्मा व शाझा मोरानी ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. या आनंदाच्या प्रसंगी श्रद्धा कपूरसह तिचे संपूर्ण कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते.