करोना काळानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून ‘झिम्मा’ चित्रपटाकडे पाहिले जाते. झिम्मा या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. शुक्रवारी २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. नुकतंच एका मराठी अभिनेत्याने याबद्दल एक प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. नुकतंच अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

yeh hai mohabbatein fame krishna mukherjee shocking revelations about the Shubh Shagun producer of her show and reveals of being harassed
“निर्मात्याने मेकअप रुममध्ये केलं बंद अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितला मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

अभिजीत खांडकेकरची पोस्ट

“झिम्मा च्या पहिल्या भागाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर दुसऱ्या भागात काय असेल ह्याची खूप उत्सुकता होती …. आणि हेमंत did not disappoint me at all . चार पाच वेगवेगळ्या बायका , त्यांना ट्रीप वर घेऊन जाणारा एक तरूण , प्रत्येकाची आपापली बॅगेजेस आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्याने कळणार्या कितीतरी गोष्टी… साधी सोपी अजिबात फॅन्सी नसलेली कन्सेप्ट… पण त्यात जे काही रंग भरले आहेत…. त्याला तोड नाही.

मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं ह्या सगळ्याच्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर अशी . इरावती चं लिखाण कधी स्क्रिप्ट वाटत च नाही . प्रत्येक बाई वेगळी , तीचा स्वभाव , पार्श्वभूमी, इश्यू वेगळे, पण त्यांचं एकत्र येणं तुम्हाला हसवतं , रडवतं , अंतर्मुख व्हायला भाग पाडतं..

झिम्मा २ मध्ये तर कितीतरी विषयांना हाताळून, अल्लाद कथेत गुंफवत, निर्मिती ताई, सुहास ताई,क्षिती, सुचित्रा ताई अश्या बाप अभिनेत्रींना मुक्त सोडत, सिद्धार्थ, सायली, शिवानी, रिंकू अश्या मल्टी टॅलेंटेड कलाकारांकडून खुबीने त्यांची पात्र साकारून घेत आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बडेजावा शिवाय हेमंत ने कमालीनं हा ‘महा झिम्मा’ सहजतेनं घातलाय.

वेगवेगळे पदर गुंता होऊ न देता अलगद उलगडून दाखवावेत तर असे सुहासताई च्या सहजतेचं काय करावं, सुचित्रा ताई सारखी आत्या तर प्रत्येक कुटुंबात असतेच, निर्मिती ताई नुसती पडद्यावर दिसली तरी हास्याचे स्फोट होतात ही तीची ताकद, क्षिती च्या सीन ची तर वाट बघावी आणि तीने सिक्सरच मारावा, सायली जशी दिसते, आहे त्या उलट कॅरेक्टर सुरेख साकारलय. एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळणारा कबीर सिद्धू ने तोडलाय, विशेष कौतुक शिवानी आणि रिंकू चं – गॅंग मध्ये नविन असुनही inseparable. सुंदर कामं केलीयेत

क्षितिज च्या गाण्यांमधुन अख्खा सिनेमा कळावा इतकी अर्थपूर्ण. अमितराज चं संगीत हे एक ह्या सगळ्यांबरोबर असणारं कॅरेक्टरच, सचिन गुरव चं पोस्टर तितकंच बोलकं, इरावती, हेमंत थॅंक यू ह्या कमाल अनुभवासाठी, आनंद एल राय आणि जिओ मुळे यंदा टीम अजुनच भक्कम झालीये त्यामुळे यंदा झिम्मा २ अजुनच गाजवणार यात शंका नाही….

हा रिव्ह्यू किंवा परिक्षण नाही. मी लेखक नसल्याने हे लिहिलेलं माझ्या विचारांइतकच विस्कळीत आहे पण मुद्दा हाच की चित्रपट आजपासुन प्रदर्शित होतोय , तो नवनवीन विक्रम करेलच, तुम्ही लवकरात लवकर पहा”, असे अभिजीत खांडकेकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी फक्त…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या रिअल लाईफ सूनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान ‘झिम्मा २’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू या अभिनेत्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.