अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून त्यांना ओळखले जाते. ‘परफेक्ट फॅमिली’ आणि ‘परफेक्ट कपल’ असंही त्यांना ओळखले जाते. त्या दोघांना एक मुलगी असून तिचं नाव जिजा असं आहे. नुकतंच आदिनाथने तिचं आणि जिजाचं नातं कसं असावं, याबद्दल भाष्य केले.

आदिनाथ कोठारेने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने सिनेसृष्टी, वडील किंवा आजोबांबरोबर असलेले नाते, पत्नी आणि मुलगी यांच्याबद्दलही मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी आदिनाथला “जिजा आता खूप लहान आहे, पण अजून १४-१५ वर्षांनी जेव्हा ती मोठी होईल आणि कोणाच्या तरी प्रेमात पडेल, तेव्हा तिच्यासाठी काय मेसेज असेल आणि त्याच्यासाठी काय मेसेज असेल?”, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने फारच छान उत्तर दिले.
आणखी वाचा : उर्मिलासोबत बिनसलेल्या नात्यावर आदिनाथ कोठारेने सोडले मौन, म्हणाला “आमच्या दोघात…”

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: आम्हीही तेव्हाच ‘व्हेटो’विरोधात होतो..
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”

“तू १४-१५ वर्षही जास्त बोललीस. त्याच्या आधीच हे होणार आहे, असं मला वाटतं. पण बापरे मला खरंच माहिती नाही, तेव्हा काय होणार आहे. माझी इच्छा आहे किंवा माझं ते स्वप्न आहे की माझं आणि जिजाचं नातं हे फार वेगळं असावं. ती जेव्हा कधी कोणाच्या प्रेमात पडेल किंवा जेव्हा तिच्या आयुष्यात हे असं घडेल तेव्हा ती पहिलं येऊन कोणाच्या कानात सांगेल तर ते माझ्या कानात सांगेल, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे तिचं आणि माझं नातं हे असंच काहीसं असावं असं मला वाटतं”, असे आदिनाथ म्हणाला.

आणखी वाचा : “माझी कोणीही क्रश नाही, पण कोकण हार्टेड गर्लचा…”, ओंकार भोजनेचा खुलासा

“मी तिच्यासाठी तितकंच मनमोकळा असावं, अशी माझी इच्छा आहे. हा सल्ला तिला देण्यापेक्षा मी स्वत:लाच हा सल्ला देतोय. मी स्वत: या गोष्टी समजून घ्यायला हव्यात, असा आता मी आहे. मी एका मुलीचा बाप असलो तरी तिचा मित्र मला व्हायचंय”, अशी इच्छाही आदिनाथने व्यक्त केली.

दरम्यान आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. उर्मिला आणि आदिनाथ या दोघांना १८ जानेवारी २०१८ ला कन्यारत्न प्राप्त झाले.आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यांच्या मुलीचे नाव जिजा असं आहे.