‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर सुभेदार हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी साकारली आहे. नुकतंच त्यांनी वाचनाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

अजय पुरकर यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कादंबरीमय शिवकाल या पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी चाहत्यांना वाचन करण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा : “सुभेदारांच्या समाधीसमोर बसलो अन्…” अजय पूरकर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Dindori lok sabha election 2024, Communist Party of India (Marxist), jiva pandu gavit
दिंडोरीत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे माकप उमेदवार उभा करणार
पिंपरी : मावळमध्ये विरोधात काम करणाऱ्या नेत्यांवर होणार कारवाई; भाजप नेत्याचा इशारा
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका

अजय पुरकर यांची पोस्ट

“सध्या वाचन कमी झालंय असं म्हणतात…..पण तुम्ही सुरुवात कुठल्याही वयात सुरू करू शकता….. माझं अत्यंत लाडकं पुस्तक म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ह्यांचं म्हणजेच अप्पा दांडेकर ह्यांचं…….कादंबरीमय शिवकाल……आवर्जून ह्या पुस्तकांनी तुमचा वाचन प्रपंच सुरू करा… जय शिवराय”, असे अजय पुरकर यांनी यात म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी

दरम्यान ‘सुभेदार’ हा चित्रपट ‘श्री शिवराज अष्टका’मधील हे पाचवं चित्र पुष्प आहे. यात सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.