अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात. सध्या अभिनेत्याचं ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ ही नाटकं आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कार्यक्रम रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. अशातच संकर्षणचा एका व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये अभिनेता शरद पोंक्षेंच्या धाडसी निर्णयाचं कौतुक करताना दिसत आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांचा धाडसी निर्णय म्हणजे ‘नथुराम गोडसे’ या नाटकाला पूर्णविराम देणं. २६ जानेवारीला या नाटकाचा शेवटचा प्रयोग पार पडला. ‘नथुराम गोडसे’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत होता. पण या नाटकाने २६ जानेवारीला अखेरचा राम राम घेतला. याचसंदर्भातील व्हिडीओ संकर्षण कऱ्हाडेने केला होता. जो शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

FM Nirmala Sitharaman
Budget 2024: प्रॉव्हिडंट फंडावरही कर! “आता जन्म, मृत्यू, लग्नावर टॅक्स लावायचा राहिलाय…” नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया
Loksatta lalkilla Hinduism BJP Assembly Elections Prime Minister Narendra Modi
लालकिल्ला: हिंदुत्व येईना कामाला, आव्हानांचा भार वाढीला
Who is Trishla Chaturvedi
“आमच्यासमोर नॉनव्हेज बिर्याणी ऑर्डर केली म्हणून ४५ दिवस गोमूत्र-शेण खाल्लं”, हा दावा करणाऱ्या त्रिशला चतुर्वेदी कोण आहेत?
Hardik Pandya Vadodara Video
Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे भव्य स्वागत…खुल्या बसमधून विजयी परेड, बडोद्यातील चाहत्यांच्या गर्दीचा VIDEO व्हायरल
sunita williams stuck in space
अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? अंतराळयानात नक्की काय बिघाड झाला?
woman crushed her lover with a stone
पिंपरी- चिंचवड: मित्राच्या मदतीने प्रेयसीने प्रियकराला दगडाने ठेचले; व्हिडीओ व्हायरल
Pune video
Pune : “भाऊ, गरम काय आहे?” ग्राहकाने विचारताच पुणेकर विक्रेत्याने दिले भन्नाट उत्तर, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Suryakumar Yadav Statement on David Miller Stunning Catch
IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

हेही वाचा – Video: मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’च्या नव्या मालिका ‘शिवा’ व ‘पारु’ ‘या’ तारखेपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

“संकर्षण किती सुंदर प्रतिक्रिया दिलीस मित्रा धन्यवाद,” असं कॅप्शन लिहित शरद पोंक्षे यांनी संकर्षणचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत संकर्षण म्हणतोय, “नमस्कार मी संकर्षण कऱ्हाडे. मी ‘नथुराम गोडसे’ या नाटकाच्या संपूर्ण टीमसाठी हा व्हिडीओ करतोय. तुम्ही आज हे नाटक आणि कलाकृती पूर्ण करताय. थांबताय, संपवताय असं चुकूनही म्हणणार नाही. तुम्ही कलाकृती पूर्ण करताय. याच्यानंतर आपल्या या कलाकृतीचा प्रयोग बघायला मिळणार नाही. हे फार धाडसाचं काम आहे. लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत असताना सुद्धा एखादी कलाकृती पूर्ण करणं, तिला पूर्णविराम देणं, हे धाडसाचं जास्त काम आहे. ऐरवी शुभारंभाच्या प्रयोगाच्या शुभेच्छा देतो तेही महत्त्वाचं आहे. ऐकवेळ शुभारंभाचा प्रयोग तुलनेने सोपा पण उदंड प्रतिसादाच्या महासागरात प्रयोग पूर्ण करणं, तो परत न करणं हे जास्त अवघड आहे. या चिकाटी आणि धाडसाबद्दल तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार, तुमच्या टीमला सलाम. तुमच्यातल्या काही लोकांना मी वैयक्तिक ओळखतो राजेश कांबळे सर आहे, घाटे सर आहेत, पोंक्षे सर अर्थात आहेतच पण तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. ही कलाकृती आता इथे पूर्ण होतं असली तरी वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा. या संपूर्ण टीमला मनापासून नमस्कार आणि अनंत शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी, धन्यवाद.”

हेही वाचा – Video: “अजून काय पाहिजे राव…”, राज ठाकरेंनी ‘चला हवा येऊ द्या’मधील ‘या’ कलाकाराच्या व्यवसायाचं केलं कौतुक, पोस्ट करत म्हणाला…

दरम्यान, शरद पोंक्षे यांनी स्वतः ‘नथुराम गोडसे’ या नाटकाच्या शेवटच्या प्रयोगाच्या दिवशी भावुक पोस्ट लिहिली होती. आता शरद पोंक्षे ‘नथुराम गोडसे’नंतर ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नोव्हेंबर २०२४मध्ये या नाटकाचे प्रयोग सुरू होणार आहेत.