मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीतील एक अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. प्राजक्ता लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच ती तिच्या फोटोशूटला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळीने नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने छान सूट परिधान केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “प्रसिद्धीसाठी वापर, पॉकेटमनी अन्…”, मानसी नाईकने सांगितली लग्न व घटस्फोटाची संपूर्ण कहाणी; म्हणाली “त्यांच्या घरी धुणी-भांडी”

प्राजक्ता माळीची पोस्ट

“Hey sexy lady..
I like your flow..
Your body is banging
Out of control…

(स्वतःला म्हणत नाहीये; ही माझी ringtone आहे.. काही caption सुचलं नाही की गाण्याचे lyrics टाकते.. – तुम्हाला तर माहितीच आहे.आत्ताही काही सूचत नव्हतं)

{विनंती विशेष- आता मराठी गाणं ringtone का नाही? ह्यावर comments मध्ये चर्चा नको.. माझ्या ringtones mood नुसार सतत बदलत असतात..आत्ता ही आहे, इतकच..}
.
कळावे
आपलीच मराठी मुलगी..”, अशी पोस्ट प्राजक्ताने केली आहे.

आणखी वाचा : मोठा स्विमिंगपूल, बेडरुमबाहेर निसर्गाचा नजारा अन्…; प्राजक्ता माळीच्या अलिशान फार्महाऊसचे फोटो पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान प्राजक्ताच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत.प्राजक्ता माळी ही लवकरच ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्राजक्ताबरोबरच वैभव तत्त्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, आनंद इंगळे हे कलाकाराही दिसणार आहेत. येत्या २९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.