Alibaba ani Chalishitale Chor Trailer : ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ च्या टिझरनंतर आता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ या गाण्यातील हूक स्टेपही केली.

‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असं आजकाल म्हटलं जातं, याचाच अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रुती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल करताना दिसत आहेत. ट्रेलर पाहता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय. आता हा ‘चोर’ कोण असणार, याचे उत्तर आपल्याला २९ मार्चला मिळणार आहे. चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच अंर्तमुखही करणार आहे.

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
sai tamhankar bought new luxurious car
Video : सई ताम्हणकरने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी! लेकीचा आनंद पाहून आई भारावली
Aishwarya narkar and avinash narkar dance on south song reel viral
Video: नारकर कपलचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश नारकरांची एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले, “काका, जबरदस्त एकदम…”
alibaba ani chalishitale chor
‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचे पोस्टर चर्चेत

लग्नानंतर अभिनयातून घेतला ब्रेक, आता दोन मुलांची आई आहे ‘राशी बेन’, मराठमोळ्या रुचा हसबनीसबद्दल जाणून घ्या

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो आणि मग सुरू होतो ‘एक्साईटमेंट’ शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे.”