‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘झिम्मा’ यांसारख्या चित्रपटांनंतर ‘नाच गं घुमा’ हा स्त्रीप्रधान चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मधुगंधा कुलकर्णी लिखित हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. मुक्ता बर्वेने या चित्रपटासाठी कोणतही मानधन न घेण्याच जणू जाहीरचं केलं होतं. याबद्दल लेखिका मधुगंधाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मुक्ताबद्दल सांगताना मधुगंधा म्हणाली, “मुक्ता एक अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. मुक्ताने या चित्रपटाला होकार दिल्यानंतर पहिलं तिच वाक्य होतं की मला काहीही देऊ नकोस, मला शून्य पैसे दे माझ्यावर जे पैसे खर्च होणार आहेत. ते तू मेकअप, हेअर्स आणि प्रोडक्टवर खर्च कर. हे किती छान आहे.”

पुढे लेखिका म्हणाली, “आजकालच्या जगामध्ये हिच्यासारखी अभिनेत्री जेव्हा असं म्हणते तेव्हा खरंच खूप अभिमान वाटतो. मी अशी आशा करते की पुढच्या चित्रपटामध्ये माझ्याकडे एवढे पैसे यावेत की अभिनेत्री म्हणून नाही तर पार्टनर म्हणून मी तिला सामील करू शकेन. “

हेही वाचा… फॅशन आयकॉन सोनम कपूर तिच्या ड्रेसमुळे झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले, “चालता फिरता हॅंगर”

मुक्ताच्या अभिनयाच कौतुक करत मधुगंधा म्हणाली, “या चित्रपटात मुक्ताने अप्रतिम काम केलं आहे. मुक्ता भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात उत्तम अभिनेत्री आहे. मुक्ता आणि नमाची केमिस्ट्री स्क्रीनवर बघणं एक ट्रीट आहे. सारंग आणि मुक्ता या कपलचं कॉम्बिनेशनपण खूप सुंदर दिसतंय.”

हेही वाचा… “मन म्हणतंय नाच गं घुमा…” लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितली चित्रपटाच्या नावामागची रंजक गोष्ट

‘नाच गं घुमा’च प्रमोशनलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आणि या गाण्यावर रिल बनवणाऱ्या प्रेक्षकांना या टीमने बक्षीस देखील जाहीर केलं आहे. या चित्रपटात मुक्ताने गाणं देखील गायलं आहे.

हेही वाचा… करण कुंद्रा तेजस्वी प्रकाश लवकरच अडकणार लग्नबंधनात? अभिनेता म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, १ मे २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वेसह नम्रता संभेराव, मायरा वायकुळ, सुप्रिया पाठारे, सुकन्या माने, सारंग साठ्ये, आशा ज्ञाते यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या चित्रपटात आहेत.